लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन, पुणे शहर
गावठी दारु वाहतुक करणा-या इसमाला सापळा रचुन पोलिसांनी
आवळल्या मुसक्या
मा. पोलिस उपआयुक्त परीमंडळ ०४ श्री. चिलुमुला रजनिकांत आणि मा. सहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री रविंद्र कदम यांचे सुचनेनुसार कारवाई करीत असताना पोलिस अंमलदार चव्हाण यांना त्याचे गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, एक इसम हा सेंट्रोकार न गावठी दारुची चाहतुक करणार असून तो सादरबाबा चौकाकडुन संगमवाडी जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन, सपोनि शिवाजीराव विभुते, सपोनि सावंत, प्रदिप चव्हाण पोलीस अंमलदार ससाने, चुकेवाड आबगे, गडमवाड यांनी मिळालेल्या बातमीनुसार संगमवाडी येरवडा पुणे या ठिकाणी जावुन सादरबाबा चौकाकडुन येणारी सेट्रो कारनं एम एच १२ डीई ९८३३ ही ताब्यात घेवुन त्यावरील चालकास नाव व पत्ता विचारला असता त्यांने त्याचे नाव सगमेश दयानंद शेटप्पा वय ३५ वर्षे रा. पाषाणकर बाग, विठ्ठल रुकमाई मंदिरासमोर लोणीकाळभोर पुणे असे सांगितले आहे. तसेच त्याचे वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एकुण २,९५,०००/- रु किंचे तयार गावठी दारु, सेंट्रोकार व एक मोबाईल मिळुन आले आहे.
- सदर कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापुरकर यांचे गार्गदर्शनाखाली लक्ष्गीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम, सपोनि शिवाजीराव विभुते, सपोनि सावंत, पोलीस अंगलदार प्रदिप चव्हाण, ससाने, चुकेवाड, आबगे, गडमवाड यानी केली.








