खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर
देशी बनावटीचे ०१ पिस्टल, ०१ जिवंत काडतुसे व गांजा बाळगणा-या ०२ इसमांना केले जेरबंद
खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर महिला पोलीस निरीक्षक, वर्षा देशमुख, यांचे देखरेखीखाली खंडणी पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना गोपनिय बातमी मिळाली की सर्वे नंबर २९/१/२ जाधव नगर नांदेड फाटा सिंहगड रोड जोएल कोरेश संकुल, ए विंग, पाचवा मजला, फ्लॉट क्र. ४१ या ठिकाणी काही मुले जमली असुन त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे. सदर बातमीचे अनुषंगाने सदर फ्लॅटमध्ये जावून तपासणी केली असता फ्लॅट मध्ये १) आर्यन राहुल सातपुते वय १९ वर्षे रा. सदर व २) विधीसंर्घषीत बालक असे मिळून आले. सदर बातमीचे अनुषंगाने फ्लॅटची झडती घेतली असता वॉशींग मशीनच्या आतमध्ये एका संगमध्ये ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस (४०५००/-रु. किंमतीचे) तसेच १५९ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ (२००० रु.किं.चा) असा एकुण ४२६००/-रु किंमतीचा मुद्देमाल मिळुन असुन त्यांचे विरुध्द बेकायदेशिर अग्निशस्त्र व गांजा (अंमली पदार्थ) बाळगले म्हणुन नांदेडसिटी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०१/२०२५ भारतीय शत्र अधिनियम कलम ३ (२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ व एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, महिला पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, सुजीत वाघमारे, आझाद पाटील, पवन भोसले, शेखर खराडे, प्रशांत शिंदे, चेतन आपटे, उदय राक्षे यांनी केलेली आहे.








