खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त करून खुनाचा कट उधळला


खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर

सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त करून खुनाचा कट उधळला

दि.१७/०२/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पुणे शहर आयुक्तालयात विना परवाना शस्त्र बाळगणा-या, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेणेकामी पोउनि रामेश्वर पार्वे व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन माळवे व अमर पवार यांना त्याचे गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, ऑक्टोंबर २०२४ मध्ये पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत संतोष उर्फ मावड्था सांळुखे यास धारदार हत्याराने मारहाण केली म्हणून पर्वती पोलीस स्टेशन येथे मु.र.नं ३४६/२०२४, भा.न्या.सं. कलम १०९ (१), ११८(१), १८९(१) (४) १९०, १९१(२), आर्म अॅक्ट कलम ४ (२५), क्रिमी. लॉ अमें. अॅक्ट ७ मोक्का ३ (१) (11), ३ (२), ३ (४) अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयामध्ये गणेश रेणूसे, आकाश म्हस्के, तेजस नायर, रोहित खडके, भैय्या पालखे व इतर ४ आरोपी आहेत.

 

सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश रेणूसे हा सध्या जामिनावर मुक्त झाला असून संतोष उर्फ भावड्या सांळुखे हा त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेवू शकतो म्हणून गणेश रेणूसे याच्या नातेवाईकांनी संतोष सांळुखे हा गणेशला मारण्याच्या अगोदरच संतोष उर्फ भावळ्या सांळुखे याचा खुन करायचा या उद्देशाने १ पिस्टल आणले असून वेतन उर्फ बाळया सिद्धनाथ जाधव, रा. दत्तवाडी, पुणे याच्याकडून त्याचा खून करणार आहेत. सदर मिळालेली बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत काईगडे यांना कळविली असता त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे शोध मोहिम राबवून दांडेकर पुल परिसरातून चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव, वय २६ वर्षे रा. सर्वे नं १३०, दांडेकर पूल, पुणे यास मांगीरबाबा चौक, दांडेकर पूल, पुणे येथून ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्टल व त्याचे मॅग्जिनमध्ये ०२ जिवंत काडतुसे असे एकूण ३५,४००/- रु. कि मुद्देमाल ताब्यात घेवून जप्त करण्यात आली त्यास खंडणी विरोधी पथक कार्यालयात आणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की, गणेश रेणूरो हा नुकताच मोक्का गुन्हयातून जामिनावर बाहेर आला आहे आणि भावड्या साळुंखेचा प्रभाव दांडेकर पूल परिसरात वाढला आहे. त्यामुळे त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेवून तो गणेश रेणूसे वर हल्ला करण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे गणेश रेणूसेची नातेवाईकांनी भावडचाचाच खुन करायचा ठरवले. त्यासाठी त्यांनी कोठूनतरी ३५०००/- रू किंचे १ गावठी पिस्टल उपलब्ध केले आणि एका सराईत गुन्हेगाराच्या मदतीने भावड्याचा खुन घडवून आणण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी सदर आरोपीची निवड केली होती

खंडणी विरोधी पथक १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य रक्तपात टाळला असून पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था परिस्थितीस गालबोट लागण्यास प्रतिबंध करण्यास पुणे पोलीसांना यश आले आहे.

त्याप्रमाणे नमुद आरोपी विरूद्ध पर्वती पो स्टे गु.र.नं. ४३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ५५, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), क्रि. लॉ. अमें. अॅक्ट कलम ७, म.पो.का.क. ३७(१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त ३. गुन्हे शाखा श्री. शंकर खटके, यांच्या मार्गदर्शननुसार खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोउपनि रामेश्वर पार्वे व पोलीस अंमलदार सचिन माळवे, दयानंद तेलंगे, अमोल आवाड, अमर पवार, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, रहिम शेख, रणजित फडतरे, प्रफुल्ल चव्हाण व राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.


2
कृपया वोट करा

RELIABLE NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!