दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ १७ महिन्यापासुन उत्तमनगर पोलीस ठाणे मधील दरोडा व घातक शस्त्राच्या गुन्हयामधील पाहिजे आरोपीस केले जेरबंद


दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१

१७ महिन्यापासुन उत्तमनगर पोलीस ठाणे मधील दरोडा व घातक शस्त्राच्या गुन्हयामधील पाहिजे आरोपीस केले जेरबंद

दि.१३/०२/२०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ पथकातील पोलीस अंमलदार ८७३२ साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, उत्तमनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ११८/२०२४ शस्त्र अधिनियम ३,४,२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१),३७ (३),१३५ सह भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४) ३१० (५) मधील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे महादेव श्रीरंग झाडे वय-२१ वर्षे, रा. अतुलनगर चौधरी शाळेचे पाठीमागे एन.डी.ए. रोड, वारजे माळवाडी, पुणे हा मिळुन आल्याने त्याचेकडे अधिक चौकशी करत्ता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके व पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली म.पोलीस अंमलदार साधना पवार, रेहाना शेख, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली.


2
कृपया वोट करा

RELIABLE NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!