२६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा झाले बाबत..


२६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा झाले बाबत..

शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, पुणे येथे दि.२६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन, समारंभ साजरा करण्यात आला. मा.ना.श्री. अजित आशाताई आनंदराव पवार, उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, पुणे जिल्हा यांनी सकाळी ०९/१५ वा. ध्वजवंदन केले. सदर वेळी श्री.जितेंद्र डूडी (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, पुणे व श्री. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, पुणे तसेच मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीरा आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे, मा.पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा.अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे श्री. संजय पाटील, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. मनोज पाटील, मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण श्री. संदिपसिंह गिल्ल, मा.पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय, पुणे शहर, श्री. सागर कवडे यांचेसह पोलीस आयुक्तालय, पुणे येथील विभागीय व परिमंडळीय अधिकारी तसेच इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, शासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रातील इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, पुणे ग्रामिण, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१, पिंपरी चिंचवड, विखली पुणे, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, पुणे, विभाग पुणे येथील अधिकारी व कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवेबद्दल मिळालेले राष्ट्रपतीचे सुधार पदक मा.ना.श्री. अजित पवार, उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनामध्ये परेड कमांडर म्हणुन सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे व सेकंड इन कमांडर म्हणुन राखीव पोलीस निरीक्षक, मुख्यालय, पुणे, श्री. सोपान देवरे यांचेसह राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१ व २. पुणे यांचेकडील एकुण ०२ प्लाटून, पुणे शहर पोलीस दल एक पुरुष प्लाटून व एक महिला प्लाटून, पिंपरी-चिंचवड पोलीस दल ०१ प्लाटुन, पुणे ग्रामीण पोलीस दल ०१ प्लाटुन, पुणे लोहमार्ग पोलीस दल ०१ प्लाटुन, होमगार्ड एक पुरूष प्लाटून व एक महिला प्लाटून, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांचे एक प्लॉटून, वन विभाग पथकाचे एक

पुरूष प्लाटुन व महिलांचे एक प्लाटून, पुणे शहर वाहतुक नियंत्रण शाखा एक प्लाटुन, आर.सी.पी. एक पुरुष प्लाटुन व महिलांचे एक प्लाटून, पुणे शहर, पोलीस वाद्यवृंद पथक गुन्हे शोधक पथकाचे श्वान पथक, वाहतुक शाखेकडील मोटार सायकल रायडर, डायल ११२ वाहन, वज्र वाहन, जलद प्रतिसाद वाहन पथक, वरूण वॉटर वाहन पथक, अग्नीशामक दल ०१ वाहन, अग्नीशामक दल ०२ वाहन, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका वाहन, पीएमआडी वाहन, महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळ बालभारती शैक्षणिक संदेश देणारा चित्ररथ वाहन, एम.एस.पी. वाहन, दृष्टी वाहन, शाळेय विद्यार्थ्याचे नऊ प्लॉटून, असे सर्व मिळुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संचलनामध्ये सहभाग घेतला होता.

शाळेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व देशाप्रती कर्तव्य निष्ठेची शिकवण देणारी तसेच भविष्यात भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण घेणारी छात्रसेनेचे पथक (१) आय.एम.टी.एस (मुले) २) आय.एम.टी.एस (मुली) ३) अपेक्स इंटरनॅशनल स्कुल (मुले) ४) अपेक्स इंटरनॅशनल स्कुल (मुली) ५) केंद्रिय विद्यालय गणेशखिंड औंध पुणे. (मुली) अहिल्यादेवी हायस्कुल शनिवारपेठ, पुणे, (मुली), न्यु इंग्लिश स्कुल ससाणेनगर, अरण्येश्वर इंग्लिश मिडीयम स्कुल प‌द्मावती (मुले), प्रियदयर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कुल (मुली) येथील मुलां-मुलींचे शानदार या पथकांनी संचलन केले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलिस अंमलदार दत्तात्रय निकम, पोलीस अंमलदार सचिन देवडे, श्रीमती शिल्पा देशपांडे (आकाशवाणी, पुणे) व रिटा. सहा. पोलीस फौजदार श्री. सिताराम नरके यांनी केले.

 

जनसंपर्क अधिकारी

पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर


2
कृपया वोट करा

RELIABLE NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!