एमडी विक्री करणा-या इसमाला सापळा रचुन पोलिसांनी आवळल्या मुसक्या


लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन, पुणे शहर

 

एमडी विक्री करणा-या इसमाला सापळा रचुन पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

दि.०४/०१/२०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हदीत मध्ये अवैध धंदयावर कार्यवाही करणेबाबत मा. पोलिस उपआयुक्त परीमंडळ ०४ श्री. चिलुमुला रजनिकांत आणि मा. सहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्री. सुनिल जैतापुरकर यांनी सुचना केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. रविंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन हदीत पोलिस अंमलदार कांबळे यांना त्याचे गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, सर्व्हे नं १० गवळी वाडादर्गावाडी येरवडा पुणे येथे एक इसम हा स्वतःचे आर्थिक फायदयासाठी एमडी विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन, सपोनि नंदनवार, सपोनि सावंत, कांबळे, शिंदे, जाधव, गायकवाड, वायाळ यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन गुप्त सापळा रचुन एका इसामास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पता विचारला असता त्याने त्याचे नाव नायाब अफाक शेख वय २३ वर्षे रा. मंगळवार पेठ, पुणे असे सांगितले आहे. तसेच त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ०२ ग्रॅम. ०२ मिलीग्रॅम (४०,००० रु.कि.चे) एमडी मिळुन आलेने जप्त करणेत आले असुन त्याबाबत लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं १०/२०२६, एन.डी.पी.एस अॅक्ट ८ (क), २१ (क), २१ (अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सदर कामगिरी मा. अप्पर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-४ श्री चिलुमुला रजनिकांत, मा. सहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग, श्री सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाईमध्ये लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम, यांचे सुचनेप्रमाणे सपोनि रविकांत नंदनवार, सपोनि मिथुन सावंत, सपोनि शिवाजीराव विभुते, कांबळे, शिंदे, जाधव, गायकवाड, वायाळ, चव्हाण, गद्दे यानी कारवाई केली. आहे.


2
कृपया वोट करा

RELIABLE NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!