चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर
दहशत माजविणा-या तसेच अवैध धंदे करणा-या अट्टल गुन्हेगारावर जिल्हा हद्दपार कारवाईपणे
शहरातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील तडीपार इसम आरोपी लक्ष्मण ऊर्फ नाना अंकुष पवार, वय ४४ वर्षे रा. विधाते वस्ती, दत्त मंदिरा जवळ, औंध पुणे. यास मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर यांचे कार्यालयाकडील जा.क्र./पोउपआ/परि-४/तडीपार/१२८७०/२०२५, दिनांक २३/१२/२०२५ रोजीचा तडीपार आदेश क्रमांक. ६६/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१) (अ) (ब) प्रमाणे दोन (०२) वर्षा करिता संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतुन तडीपार करण्याचे आदेश झाल्याने नमूद तडीपास इसमास चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे दि.२९/१२/२०२५ रोजी तडीपार आदेशाची बजावणी केली आहे.
तसेच पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील खालील तडीपार इसम आरोपी नामे अजिंक्य आशोक बोबडे, वय १९ वर्षे रा. विधाते वस्ती, सध्या रा. सदगुरूकृपा संत तुकारामनगर, नवी सांगवी पुणे. यास मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर यांचे कार्यालयाकडील जा.क्र./पोउपआ/परि-४/तडीपार/१२८७१/२०२५, दि.२३/१२/२०२५ रोजीचा तडीपार आदेश क्रमांक. ६७/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे एक (०१) वर्षा करिता संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतुन तडीपार करण्याचे आदेश झाल्याने नमूद तडीपार इसमास चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे दि.२९/१२/२०२५ रोजी तडीपार आदेशाची बजावणी केली आहे.
सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि-०४ पुणे शहर, श्री. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन श्री. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी ननावरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार विनय बडगे, गणेश पालांडे, संदिप ठोसर, श्रीकांत वाघवले, बाबा दांगडे, इरफान मोमीन, बाबू शिर्के, विशाल शिर्के, तुषार गिरंगे महिला पोलीस अंमलदार वैशाली जाधव सर्व नेमणूक चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर, यांनी सदरची कारवाई केली.








