पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर
सोन्या चांदीचे दागिने पॉलीश करुन देण्याचे बहाण्याने लुट करणारी पर राज्यातील टोळी पकडुन फसवणुक केलेले २० ग्रॅम वजनाचे सोने केले जप्त.
दि.२१/१२/२०२५ रोजी सनं १३०, जयमहाराष्ट्र मित्रमंडळ जवळ, चारभुजा दुकाना शेजारी, दांडेकर पुल, पुणे येथे फिर्यादी यांनी त्यांच्या हातातील सोन्याचे बांगड्या पॉलीश करण्याचे बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वारा संपादन करुन हातचलाखीने दोन अनोळखी इसमांनी स्वतःचे आर्थिक फायदयासाठी, लबाडीचे इरादयाने हातचलाखी करुन सोन्याच्या दोन बांगड्या घेवून गेले आहेत. म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ४०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी श्री. किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदार करत असताना पोलीस अंमलदार अमित चिव्हे, नानासाो. खाडे, राकेश सुर्वे, प्रसाद पोतदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, करुन मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन शापाळा रचुन आरोपी नामे १) शिवकुमार विनोद साह, वय २१ वर्षे रा. ग्राम पज, गचिया बाजार, तहसिल गोपालपुर जि. भागलपुर बिहार, २) प्रितमकुमार सुशिल साह, वय २३ वर्षे, रा. ग्राम पज, गचिया बाजार, तहसिल गोपालपुर जि. भागलपुर बिहार, सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे ३) गोविंद सुशील साह, वय २९ वर्षे, रा. ग्राम पज, गचिया बाजार, तहसिल गोपालपुर जि. भागलपुर बिहार, सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे ४) मदन गंगा भगत, वय २३ वर्षे, रा. गाव तुलसीपुर, जमुनिया तहसिल साहु प्रबत्ता जिल्हा भागलपुर सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे व ५) राजा रामबारानी यादव वय ३२ वर्षे रा. ग्राम लखरा तहसिल गोपालपुर, जि. भागलपुर बिहार सध्या रा. माळवाडी शायना हॉटेलच्या पाठीमागे तळगाव दाभाडे पुणे यास अत्यंत शिताफीने पकडुन त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आले असुन त्याचे ताब्यातुन २० ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड, तसेच पॉलिश करण्याचे साहित्य असा एकुण २,५०,३००/- रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नंदकुमार गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किरण पवार, इसराईल शेख, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित विव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, महेश मंडलिक, प्रसाद पोतदार, शाहरुख शेख, अमोल दबडे, सुर्या जाघव स्वप्निल घुगे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, किर्ती भोसले, व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली आहे.








