पोलीस उप आयुक्त कार्यालय, वाहतूक विभाग, पुणे शहर
FER 24
दिनांक : 05 जानेवारी 2025
वाहतूक सुरक्षेसाठी पुणे शहरात मद्यपान करून वाहन चालवणारे चालक तसेच ट्रिपल सीट वाहनचालक यांच्या विरोधात धडक कारवाई
पुणे शहरातील वाहतूक शिस्त अबाधित राखण्यासाठी व नागरिकांच्या प्राणसुरक्षेस प्राधान्य देण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून दि. 02 जानेवारी 2026 ते दिनांक 04 जानेवारी 2026 दरम्यान मद्यपान करून वाहन चालवणारे चालक आणि ट्रिपल सीट वाहनचालक वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली.
कारवाईचा तपशील :
मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या एकूण 232 वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम कलम 185 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ट्रिपल सीट असलेल्या 720 दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 121 मोटारसायकल वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
! वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांचा धोका वाढतो व निष्पाप नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. नियमांचे काटेकोर पालन केल्यास शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध राहते.
> सर्व वाहनचालकांनी मोटार वाहन अधिनियमातील नियमांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, पुणे शहर








