विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व युनिट ०३, गुन्हे शाखा, पुणे शहर
मुलीच्या सहाय्याने मृत्यूच्या जाळ्यात अडकवुन, अपहरण व खुन केलेल्या आरोपीना केले जेरबंद.
दि.३१/१२/२०२५ रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे येथे फिर्यादी यांनी समक्ष येऊन तक्रार दिली की, त्यांचा मुलगा नामे अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड, वय १७ वर्षे, रा. टिंगरेनगर, लेन नं. १४, पुणे हा दि. २९/१२/२०२५ रोजी तो वापरत असलेली सुझुकी कंपनीची अॅक्सीस गाडी नं. MH १२ XV ८०२९ ही घेऊन राहते घरातून गेला तो परत आला नाही. सदर प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्ह्याचा तपासात अपहरण झालेल्या मुलाच्या मोबाईल फोनचे सीडीआर व लोकेशन वापरून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखा, युनिट ३ पुणे शहर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार करत असताना गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अंमलदार यांना गोपनिय बातमी मिळाली की, ‘दाखल गुन्ह्यातील अपहृत मुगला अमन सुरेंदसिंग गच्चड यास उत्तमनगर परिसरात राहणारे १) प्रथमेश चिंदु आढळ २) नागेश बालाजी धबाले व त्यांचे इतर मित्र यांनी त्याचे सोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याचे अपहरण केले आहे. सदर प्राप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपंचा शोध घेत असताना आरोपी हे बेळगाव कर्नाटक येथे अराल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेतला असता १) प्रथमेश चिंधू आढळ, वय १९ वर्षे, रा. उत्तमनगर, पुणे २) नागेश बालाजी धबाले वय १९ वर्षे, रा.शिवणे, पुणे व दोन विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले.
सदर आरोपींकडे केलेल्या चौकशीत अ.क्र. २ याची मैत्रीणीने इन्टाग्राम अॅपवर चॅटींगव्दारे ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दि. २९/१२/२०२५ रोजी त्या मुलीने अपहृत मुलास भेटण्याच्या बहाण्याने कात्रज येथे बोलावले. कात्रज येथे भेट झाल्यावर, अपहृत मुलास त्या मुलीने त्याच्याच गाडीवरून फिरण्यासाठी चर्तुभुज मंदीर, खेड शिवापुर येथे नेले. तेथे मुलगी व अपहृत मुलगा हे दोघे मंदीरामध्ये देवदर्शन केले. त्यावेळी नमुद आरोपी क्र. १, २ व त्यांचे इतर साथीदार तेथे पाळत ठेऊन थांबलेले यांनी मुलीच्या इशा-यावर अपहृत मुलारा मंदीराच्या बाहेरून ताब्यात घेतले व तेथुन जंगलामध्ये अंदाजे दोन ते तीन कि.मि. अंतरावर नेऊन त्याचा निघृणपणे खुन केला. अशी नमुद आरोपींनी गुन्हाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. दोन आरोपी व दोन विधीसंघर्षीत बालक यांना विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे
पुढील तपासकामी सुपूर्त केल्यावर त्यांचेकडे अधिक तपास करून अटक केली. सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व
प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोजकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४. चिलुमुला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर, श्री. सुनिल जैतापुरकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक श्री. राजमाने गुन्हे शाखा, पुणे शहर व विश्रातवाडी पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली.








