एम.आय.टी, वर्ल्ड पीस युनिर्व्हसीटी, पुणे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन उत्साहात साजरा झालेबाबत.


  • एम.आय.टी, वर्ल्ड पीस युनिर्व्हसीटी, पुणे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन उत्साहात साजरा झालेबाबत.

दि.०८ जाने २०२६ रोजी सकाळी ११/०० वा.ते १३/०० वा. चे दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसीटी कॉलेज कोथरुड, पुणे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन २०२६ (Raising Day) साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या निमित्ताने मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, पुणे शहर यांनी महिला सुरक्षा, सायबर क्राईम, नारकोटिक्स् बाबत उपस्थित १,००० विद्यार्थी व ऑनलाईन माध्यमाद्वारे एकुण ९८१ शाळा, कॉलेज यांना Zoom Meeting Link द्वारे जोडल्याने मा. पोलीस आयुक्त पुणे यांचे मार्गदर्शन ५ लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मिळाले आहे.

सदर कार्यक्रमा निमित्ताने पुणे पोलीसांकडुन पोलीस दलाचे कामकाजा बाबत माहिती देण्याकरता प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामध्ये शस्त्र प्रदर्शन, बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS), डॉग स्कॉड पथक, पोलीस बेंन्ड पथक, ट्राफिक बाबत जनजागृती, दामिनी पथक, जलद प्रतिसाद पथक (QRT), सायबर सेलचा स्टॉल (Cyber cell), मोबाईल सर्वेलन्स व्हॅन (Mob Surveillance Van) अशा विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.

सदर कार्यक्रमांचे वेळेस मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी उपस्थित एम.आय.टी. कॉलेज कडील विद्यार्थी यांना सायबर सुरक्षेबाबत, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, ट्राफिक सुरक्षिततेबाबत जनजागृती, दृश्य पोलीसींगमध्ये विद्यार्थी व जनतेचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ट्राफिक सुरक्षेसाठी (Pune Traffic Police App) डाऊनलोड करण्याबाबत आवाहन केले.

तसेच शहर सुरक्षेसाठी पोलीस आणि नागरीकांची पार्टनशीप अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः युवक, कारण ते भारताचे भविष्य आहेत. त्यांचे चरित्र उत्तम असल्यास जीवनाला शिस्त असल्यास गुन्हेगारी प्रवृत्ती संपेल. समाजाने ड्रग्ज, गांजा, दारु इतर मादक पदार्थाचे सेवन या सारख्या व्यसनात स्वःताला अडकवुन कुटुंबाचे नुकसान करु नये तसेच पोलीस म्हणुन आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर आहोत असा संदेश दिला. तसेच कॉलेजमधील विद्यार्थानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मा. पोलीस आयुक्त यांनी दिली.

मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावणा केली. मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख व मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गौतम बापट व आभार प्रदर्शन श्री. प्रसाद खांडेकर यांनी केले. श्री.आर.एम चिटणीस, व्हाईस चॉन्सलर यांनी मान्यवरांचे स्वागत तसेच मार्गदर्शनपर भाषण केले.

सदर कार्यक्रमांची रुपरेखा व नियोजन हे मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख व मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री.शैलेश संखे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.राम राजमाने, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन श्रीमती स्वप्नाली शिंदे यांनी केली.


2
कृपया वोट करा

RELIABLE NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!