पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर
चारचाकी पिकअप चोरी करणा-या आरोपीस अटक करुन एकुण १४,०९,०००/- रु.चा मुद्देमाल केला जप्त.
दि.१९/१२/२०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३९७/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी त्यांचे ताब्यातील पिकअप ९,००,०००/- रु. किं.चा व त्यामध्ये ५,२९,००० रु. किं.च्या इलेक्ट्रोनिक वस्तु अराणा-या मुद्देमाला राह एकुण १४,२९,०००/- रु. किं.चा मुद्देमाल एका अज्ञात चोरट्याने चोरी केले बाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी श्री. किरण पवार व तपारा पथकातील पोलीस अंमलदार करत असताना पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरुन सापाळा रचुन आरोपी नामे शिवा मिड्डुलाल यादव, वय २० वर्षे, रा. काळुबाई मंदिराजवळ, वरद अपार्टमेंट, जाधव वस्ती चिखली पुणे. यास अत्यंत शिताफीने पकडून त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आले असुन त्याचे ताब्यातुन एम महिंद्रा पिकअप व इलेक्ट्रोनिक वस्तुचे बॉक्स असा एकुण १४,०९,०००/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री.धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर सहा. पोलीस निरी, श्री. राहुल नामदे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक श्री. किरण पवार, पोलीस अंमलदार सदाशिव कोपनर, प्रकाश मरगजे, प्रविण जगताप महेश मंडलिक, स्वप्निल घुगे, सुर्या जाधव, राद्दाम शेख, मनोज बनसोड, अमोल दबडे, अमित चिव्हे, नाना सोखाडे, राकेश सुर्वे व किर्ती भोसले यांनी केली.








