जुन्या भांडण्याच्या वैमनस्यातुन तरुणाचा खुन करणारे आरोपी १२ तासात केले जेरबंद


येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर

 

जुन्या भांडण्याच्या वैमनस्यातुन तरुणाचा खुन करणारे आरोपी १२ तासात केले जेरबंद

 

येवलेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी कमानीच्या पुढे, मिनू मेहता सोसायटीकडे जाणारे कच्च्या रोडवर, आकाश कृष्णा चाबुकस्वार, वय २१ वर्षे, रा. फुरसुंगी, पुणे (मयत) याचा रस्ता आडवून जुन्या मांडण्याच्या कारणावरुन वाद घालुन एकुण सात आरोपी यांनी आकाश चाबुकस्वार यांस लाथा बुक्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घालुन निघृण खून केला म्हणून येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.०२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १८९ (२), १९०,१९१ (२), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे दाखल होता, गंगीर गुन्हा करून फरार झालेल्या आरोपींच्या शोध घेणे बाबत मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ यांनी तपास पथकाच्या तात्काळ दोन टिम तयार करुन पाहिजे आरोपींचे शोध घेणे कामी रवाना केल्या सदर तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि राकेश जाधव व अमंलदार सुजीत मदन यांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नामे १) आदित्य सुभाष गायकवाड, वय १९ वर्षे, रा. गोकुळनगर, कोंढवा, पुणे २) गणेश किशोर मोरे, वय २० वर्षे, रा. कात्रज-कोंढवा, पुणे ३) कौशल्य उर्फ ऋषी जनार्धन मारे, वय १९ वर्षे, रा. तुळजाभवानी निवास, कोंढवा, पुणे. यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपीतांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

सदरची कामगिरी मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि.०५, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अमर काळंगे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सुषमा हिंगमिरे, संदिप पवार, गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, विजय खेगरे, अनिल बनकर, मयुर मोरे, अमोल तावरे व अक्षय शेंडगे यांनी केली.


2
कृपया वोट करा

RELIABLE NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!