लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर तडीपार आरोपीच्या सापळा रचुन पोलिसांनी आवळल्या मुसक्या


लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर

तडीपार आरोपीच्या सापळा रचुन पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वरिष्ठांनी लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन हदीतील तडीपार आरोपीदर कार्यवाही करणेबाबत अवगत केले होते. सदर सुचनेचे अनुषंगाने मा. पोलिस उपआयुक्त परीमंडळ ०४ श्री. चिलुमुला रजनिकांत आणि मा. राहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्री सुनिल जैतापुरकर यांनी देखील सदर बाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री रविंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन हदीत पोलिस अंमलदार वायाळ, यांना त्याचे गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, तडीपार आरोपी नामे प्रज्वल नविन जाडयाल हा लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन हद्दीत येणार आहे.

सदर बाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री रविंद्र कदम लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन, सपोनि नंदनवार, सपोनि सावंत, सपोनि शिवाजीराव विभुते, व पोलीस अंमलदार कांबळे, शिंदे, जाधव, वायाळ, चव्हाण, गद्दे यांनी मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन गुप्त सापळा रचुन एक इसामास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांने त्याचे नाव प्रज्वल नविन जाडयाल वय २० वर्षे रा. सर्व्हे नं १० कामराजनगर येरवडा पुणे असे सांगितले आहे. तसेच त्याची अंगझडती घेतली अराता त्याचेकडे १५०/- रु किंमतीचा लोखंडी कोयता मिळुन आलेने तडीपार आरोपीवर लक्ष्मीनगर पोलिस स्टेशन गु.र.क्र.२३/२०२६ महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४(२५), सह क्रि. लॉ. अॅ.क.३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ०४ श्री चिलुमुला रजनिकांत, मा. सहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, सपोनि रविकांत नंदनवार, मिथुन सावंत, शिवाजीराव विभुते, पोलीस अंमलदार कांबळे, शिंदे, जाधव, वायाळ, चव्हाण, गद्दे यांनी केली,


2
कृपया वोट करा

RELIABLE NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!